बँकेत पैशाला धोका


या घोटाळा सत्रामध्ये
आता बॅंकेचं खातं आलं आहे।
घरातच पैसा ठीक आहे
बँकेत नको तेथे धोका आहे।
जो जितका मोठा तोच
आज कर्जबुडव्या आहे।
बेशर्मपणे फिरतात खुलेआम
त्याला ना कशाची भिती आहे।
आपल्या लोकशाहीत हेच चालतं
चोर सोडुन संन्याशाला फाशी आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments