बापाचा-बाप कायदा


बोलता बोलता काही ही
हे पुढारी बोलत असतात।
कायद्याचा विचार नाही कसला
मग शिक्षेसाठी पात्र ठरतात।
ना येथे कोणता पक्ष
ना कोणता हुद्दा मोठा आहे।
कायद्यात जो गुंतला तो
कायद्याच्या नजरेत गुन्हेगार आहे।
कारण बापाचा- बाप येथे
कायदा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments