शेतकऱ्याची जो तो
उडवतोय आज खिल्ली।
मनात जर आणलं ना
शेतकऱ्यांनी तर उपाशी मरेल दिल्ली।
शेतकऱ्याचा अंत तुम्ही
असा उगाच पाहु नका।
जगाचा पोशिंदा आहे तो
त्यांना तुम्ही असं हिणवू नका।
तो सुखी तर आपण
सारे सुखी आहोत।
त्याच्या विना आपण शुन्य
अन् आपण सर्व भिकारी आहोत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment