का उगाच शेतकऱ्याची
मेघराजा परीक्षा पाहतो।
हसतं खेळतं जीवन
या लबाडांच्या हाती देतो।
ना कसला मोबदला
ना योग्य हमीभाव मिळतो।
विमा कंपन्या होतात
येथे वारंवार मालामाल।
जगाचा पोशिंदा मात्र
अहोरात्र बनून राहतो हमाल।
नको फुकटचा मेवा आम्हाला
नको ते हलकट तुमचे दान।
चोरांकडून काय अपेक्षित...?
त्यांचेच येथे राहते घर गहाण।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment