दुधाची हेळसांड



वारंवार बळी राजाला

येथे त्रास दिला जातोय।

ना कोणत्या पिकाला योग्य भाव 

ना कधी दुधाला मिळतोय।

कसं विसरतात हे मंत्रीलोक

बळीराजाच्या कष्टाला।

रडवता तुम्ही चक्क त्याला

जो सुखी ठेवतो साऱ्या जगाला।

सुखी ठेवा बळी राजाला

सारं त्याच्या हातात आहे।

नसता धरणी माय जागा

सोडेल तोंडावर निवडणूक आहे।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments