अटल कौतुक


आज जगभर कसे ते
अटल कौतुक होतं आहे।
धडकाकेबाज नेता तो
काळाच्या पडद्या आड आहे।
नावाप्रमाणेच राजकारणात
एक अटल ठसा उमठुन गेले।
शब्द अपुरे कवितेला अन्
कौतुक कसे जगभर चालले।
काळजावर दगड ठेवुनिया
कवी मनाच्या राजाला निरोप दिला।
अटल किर्तीरुपी सूर्य आज
अजरा अमर होऊनीया गेला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments