दोरी गंडा


दोरी गंडा घातला की
आजार गायब बरं वाटतं।
नको ते इंजेक्शन सलाइन
दोरी गंड्याच खरं वाटतं।
दोरी गंडा आज
पैशाला ही बसत आहे।
किती बी असुद्या पैसा
तरी कमी पडत आहे।
दोरी गंडा घालुन
कोणाच बरं होतं नसतं।
गरिबाची हाय लागुन
आयुष्याच पान मात्र पलटी होतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments