कर्ज माफीच काय झालं



कर्ज माफीच काय झालं..?

संगळ्यासाठी हिरो तुम्ही ते

साऱ्यांच पाठबळं आज मिळालं..!

शेतकरी राजाला मरण ते

त्याला ना निसर्गाने ना तुम्ही तारलं।

सर्वसामान्यांचा उठता प्रश्न तो

कर्ज माफीच नेमकं काय झालं..?

जाहिरनामा आठवतोय का..?

का तो ही विसरला आहे।

खटंपट तर करणार तुम्ही

कारण तोंडावर विधानसभा आहे।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Comments